
अहिल्यानगर संपादक –
योजनेअंतर्गत शहरातील भुयारी गटार योजना व मलनिस्सारण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. त्याची चाचणी सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच ही योजना कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसेच, शहराच्या उपनगर भागांसाठी नव्याने दुसऱ्या टप्प्यातील भुयारी गटार योजना राबविण्यात येणार आहे.
त्याचा ६१७ कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात ड्रेनेज लाइनसह आणखी एका मलनिस्सारण प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. लवकरच हा आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.
केडगाव, आगरकर मळा, कल्याण रोड, बोल्हेगाव, नागापूर, संपूर्ण सावेडी उपनगर, छत्रपती संभाजीनगर रस्ता परिसर, मुकुंदनगर, गोविंदपुरा परिसरात नवीन योजनेचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ड्रेनेज लाईन, तीन पंपिंग स्टेशनसह आणखी एक १८ एमएलडी क्षमतेचा मलनिस्सारण प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मध्य शहर वगळता उर्वरित सर्व उपनगर परिसरात ६७२ किलोमीटर लांबीची ड्रेनेज लाईन प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य शासनाकडे हा आराखडा तांत्रिक मान्यता घेण्यासाठी सादर करण्यात येणार आहे..
Discussion about this post