सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन व विधानपरिषद आमदार अमित गोरखे, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष दिलीप कांबळे, आमदार सुनिल कांबळे यांची उपस्थिती..!!
__________________________________________ अनुसूचित जाती आरक्षणाचे अबकड उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी काल तारीख 5 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानावर संपन्न झालेला “मांगवीर महामोर्चा” अतिशय उत्साहात व हजारोंच्या जनसंख्येत संपन्न झाला..
संपूर्ण राज्यभरातून मोठ्या संख्येने मातंग समाजबांधव, भगिनी व आरक्षण लाभ वंचित जाती या महामोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सरकारचे मंत्री नामदार गिरीश महाजन, विधान परिषद आमदार अमित गोरखे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री दिलीप कांबळे,
आमदार सुनील कांबळे यांनी या महामोर्चाला भेट देऊन शिष्टमंडळाच्या वतीने सदरील मागणी शासनाकडे पोहोचवली यावेळी माहे जूनपर्यंत आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी सकल मातंग समाजाच्या वतीने यावेळी सरकारला करण्यात आली…
याप्रसंगी या मांगवीर महामोर्चात उपस्थित समाज बांधवांना मी संबोधित केले..
यावेळी माझ्या समवेत जिल्हा नियोजन समिती सदस्य राजु आहिरे, सहकारी गजानन मानकर, राहुल अंभोरे, शंभुनाथ रणक्षेत्रे, संजय कसारे, दिपक कसारे आदींची उपस्थिती होती…!!
Discussion about this post