प्रतिनिधी दि..
कवयित्री ‘मनिषा मिसाळ – लोखंडे’ यांनी लिहिलेल्या ‘गंध ओल्या गवताचा’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिनांक ८ मार्च रोजी सकाळी दहा वाजता श्री बिरोबा विद्यालय पांगरी ता, माण येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आव्हान करण्यात आले आहे.
या काव्यसंग्रहाचे प्रकाशन डॉ. मेरू लोखंडे व सौ, सुलोचना लोखंडे यांच्या शुभहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे 'पाठ्यपुस्तकातील कवी व सुप्रसिद्ध गीतकार' हनुमंत चांदगुडे, तर निमंत्रित कवी अनिल कदम, सोमनाथ सुतार, चंद्रकांत चाबुकस्वार, बाबासाहेब कोकरे हे कवी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी राहुल निकम करणार आहेत. या काव्यसंग्रहाची प्रस्तावना पाठ्यपुस्तकातील कवी 'हनुमंत चांदगुडे' यांची असून सुप्रसिद्ध सिनेअभिनेते 'सयाजी शिंदे' आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री 'अलका कुबल -आठल्ये' यांनी काव्यसंग्रहासाठी लिखित शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रकाशन सोहळ्यासाठी सर्व साहित्यरसिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान कवयित्री मनिषा मिसाळ - लोखंडे यांनी केले आहे.
Discussion about this post