
प्रा. दिलीप नाईकवाड..
सिंदखेडराजा : तालुका प्रतिनिधी..
तामिळनाडू येथील मंगलम गावातील 32 वर्षे तरुण शेतकरी सलाई अरुण यांनी आपल्या मेहनत आणि समर्पण भावनेने 300 पेक्षा जास्त दुर्लभ असलेल्या देशी भाज्यांच्या नष्ट होणाऱ्या बियांचे संरक्षण केले आहे. लहानपणापासून त्यांना शेती मध्ये आवड आहे. अरुण यांनी 2011 मध्ये जैविक कृषी वैज्ञानिक जी नम्मालवार यांच्याकडून प्रशिक्षण घेतले, त्यामुळे त्यांची कृषी क्षेत्रातील आवड आणखीनच वाढली.
अरुण यांनी निरीक्षण केले की शेतकऱ्यांकडे देशी भाज्यांच्या बियांची कमतरता आहे. या समस्येच्या समाधानासाठी त्यांनी 2021 मध्ये संपूर्ण भारतभर यात्रा करायचा निर्णय घेतला. वास्तविक त्यावेळेस त्यांच्याजवळ फक्त 300 रुपये होते. परंतु निर्धार पक्का होता. त्यांनी हार मानली नाही. 80 हजार किलोमीटरचा प्रवास करत 500 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना भेटून 300 पेक्षा अधिक दुर्लभ असलेल्या भाज्यांचे बीच त्यांनी एकत्रित करून. आपल्या गावातील एका छोट्या बगीच्या मध्ये या नष्ट होणाऱ्या देशी फळ आणि भाज्या उगवणे सुरू केले. त्यांनी त्याठिकाणी कारपागथारू या नावाने एक बँक सुरू केली, ज्या माध्यमातून त्यांनी लौकी च्या 15, बीन्स च्या वीस, टमाटर, मिरच्या, तोरई च्या दहा- दहा प्रकारच्या भाज्यांच्या बियासह आणखीन ते काही भाज्यांचे बी उपलब्ध करून राहिले आहे.
अरुण यांचे प्रयत्न केवळ जैविक शेतीला प्रोत्साहन देत नाही तर देशी बियांचे संरक्षण करणे हे महत्त्वपूर्ण कार्य आणि योगदान ते देत आहे. त्यांची कहाणी प्रेरणादायक असून प्रचंड मेहनत आणि समर्पण यावर कोणतेही लक्ष प्राप्त केले जाऊ शकते. हीच गोष्ट त्यांच्या कडून शिकायला मिळते..
Discussion about this post