
प्रतिनिधी-समाजसेवक सोमनाथ भाऊ
महाराष्ट्रात सर्वात मोठा श्री क्षेत्र सिद्धटेक येथे भव्य दिव्य गाथा पारायण सोहळा – अमृत महोत्सवी वैकुंठगमन सोहळ्याचे आयोजन
सिद्धटेक | जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृत वैकुंठगमन सोहळा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन रविवार, २३ मार्च २०२५ ते रविवार, ३० मार्च २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र सिद्धटेक (बेर्डी), ता. कर्जत, जि. अहिल्यानगर येथे करण्यात आले आहे.
या सोहळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आपल्या वाणीने संत तुकाराम महाराजांचा महान वारसा जागवणार आहेत. विशेष म्हणजे, ह.भ.प. माऊली महाराज कदम यांच्या अमृतमय वाणीतून संत तुकाराम महाराजांचे जीवनचरित्र कथा सांगितली जाणार आहे.
सोहळ्याचे वैशिष्ट्ये:
✅ श्री सद्गुरु महाराजांच्या पादुका हेलिकॉप्टरद्वारे श्री क्षेत्र सिद्धटेक येथे आणण्यात येणार
✅ २४ तास अखंड “तुकाराम तुकाराम” नामस्मरण व भजन
✅ भव्य दिव्य गाथा पारायण सोहळा
✅ महाराष्ट्रातील आठ तालुक्यांचा समन्वय: कर्जत, जामखेड, श्रीगोंदा, इंदापूर, बारामती, करमाळा, शिरूर, आष्टी
✅ दररोज एक लाख भाविकांसाठी महाप्रसाद
या ऐतिहासिक सोहळ्याचा वारकरी संप्रदाय आणि संत भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन दौंड तालुका वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष ह.भ.प. सुभाष भोसले सर यांनी केले आहे.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावाने संपन्न होणार असून, संपूर्ण महाराष्ट्रभरातील वारकरी बांधव, संतप्रेमी आणि भक्तगण यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
चलो सिद्धटेक! चलो सिद्धटेक! चलो सिद्धटेक!
हरि मुखे म्हणा, तुकाराम! तुकाराम तुकाराम!
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क-9595328332
Discussion about this post