आजरा कोविड सेंटर मधील कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन मिळवण्यासाठी गर्जना संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका
आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये आजरा कोविड सेंटरमध्ये मानधन तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या माहे ऑगष्ट २०२१ चे मानधन थकीत होते. यासाठी लागणारी अनुदानाची रक्कम रु. ७५९२००/- (सात लाख एकोणसाठ हजार दोनशे रुपये) होती.
गर्जना संघटनेने या प्रश्नावर त्वरित लक्ष केंद्रीत करून शासनाच्या विविध स्तरांवर पाठपुरावा सुरू केला. संघटनेच्या अथक प्रयत्नांनी थोड्या कालावधीतच या विषयावर निकाली तोडगा काढला, आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन प्रदान करण्यात आले.
गर्जना संघटना यापुढेही जनतेच्या हक्कांसाठी आपले कार्य सतत सुरू ठेवेल.
Discussion about this post