
उदगीर /कमलाकर मुळे :
रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे नुकत्याच राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा पार पडल्या .या स्पर्धेमध्ये गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे .ते खालील प्रमाणे खेळाडू आहेत. जानवी बाबाराव पवार (इंडियन राउंड) प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. भारती बाबाराव पवार (रिकर्व राऊंड) प्रकारामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे. कल्याणी हरिदेव पवार( कंपाउंड राउंड) तन्वी कामठी (इंडियन राऊंड) प्रकारामध्ये सुयश गदादे (कंपाउंड राउंड) प्रकारामध्ये अद्वैत शिर्के( कंपाउंड राउंड) प्रकारांमध्ये या सर्व खेळाडूंची निवड आंध्र प्रदेश मधील गुंटूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी झाली आहे. या स्पर्धा २० मार्च ते 30 मार्च या कालावधीत पार पडणार आहेत.तरी या सर्व खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे व त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत..
Discussion about this post