

मराठी #साहित्य #मंडळ केवळ एक साहित्य मंडळ नाही तर एक प्रसिद्ध ब्रँड होण्याकडे वाटचाल करतोय कारण याचे जे राष्ट्रीय अध्यक्ष #डॉ #जयप्रकाश #घुमटकर उर्फ #कवी #गोलघुमट आहेत यांची एक विशेष भूमिका आहे की आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि समिती सदस्यांना मोठं करायचं त्यांना वलय प्राप्त करुन द्यायचं आणि त्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात….. नुकतेच #अकरावे #अखिल #भारतीय #मराठी #साहित्य #संमेलन (#जवाहर #विद्यार्थीगृह #न्यू #नंदनवन )#नागपूर येथे संपन्न झाले… आणि सकाळी साडे सात वाजल्यापासून एक एक विद्यार्थी ग्रूप, शिक्षक, कवी, साहित्यिक, मंडळातील पदाधिकारी, चॅनेलवाले, पत्रकार, ग्रंथ दिंडी साठी जमू लागले साहित्याच्या चळवळीत चार शाळा कॉलेज सम्मिलीत झाले आणि खरी रंगत येऊ लागली मराठी भाषेच्या घोषणा, बॅनर, आणि भजन मंडळी या सर्वाने वातावरण उत्साही झाले आणि सर्व स्तरातील लोकं मिळून ३००/४०० लोकांचा जमाव कधी जमला कळलच नाही, मर्यादित भाषणे, परिसंवाद, कवी संमेलन, पुरस्कार वितरण सोहळा आणि सामाजिक बांधीलकी जपणारा शपथ सोहळा असे सर्वांगीण स्वरूप साहित्य संमेलनाला प्राप्त झाले… प्रशस्त हॉल
मुळे, गार्डन मुळे आणि जेवण व्यवस्थेमुळे साहित्य संमेलनाला एका अभूतपूर्व सोहळ्याचे स्वरुप प्राप्त झाले आणि हे सर्व घवघवे परिवार आणि संपुर्ण नागपूर विभाग यांच्या सहकार्याने आणि अथक परिश्रमाने साध्य झाले,लवकरच भंडारा, ठाणे वर्धा, अमरावती या जिल्ह्यात सुद्धा संमेलन घेण्याची जय्यत तैयारी सुरु राहिल असे मा सिद्धार्थ कुलकर्णी यांनी जाहीर केलं..
Discussion about this post