
छत्रपती श्री.शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती सरदार पटेल वॉर्ड वरोरा यांच्या आयोजनात मोठया उत्साहाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निम्मित बाळ शिवभक्तांनी नृत्य स्पर्धा घेतली.
प्रातकालीन महाराजांच्या पुतळ्याचे दुधाने राज्यभिषेक करण्यात आला.
युवक व युवतीने भगवे पोशाख घालुन पारंपरिक महाराष्ट्रीयन नृत्य लेझीम वर उत्कृष्ट नृत्य केले.
तसेच सुर नवा ध्यास कलर टीव्ही फेम चे विजेता साहिल पांढरे व त्यांच्या चमुच्या वतीने गायनाचा सुद्धा कार्यक्रम घेण्यात आला.
त्यावेळी साहिल पांढरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गाण्यावर गायन करून उपस्थित शिवभक्तांचे मन जिंकले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर काही वक्त्यांनी भाषण देऊन महाराजांच्या विचाराला जागृत केले.
बाळ शिवभक्तांनी महाराजांची शौर्य गाथा एकूण शिवगर्जना सुद्धा दिली.
तसेच शिवजयंती ला नृत्य स्पर्धा मधे सहभागी होणाऱ्या स्पर्धकांचे व वरोरा शहरातील मान्यवरांचे छत्रपती श्री. शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती सरदार पटेल वॉर्ड च्या वतीने पुष्पगुछ व सन्मान चिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच
जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव नारे लावत बाळ शिवभक्तांनी शिवजयंतीचा आनंद लुटला.
शिवजयंतीला वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य नितीन मत्ते, माजी नगराध्यक्ष अहतेश्याम अली, माजी युवासेना जिल्हा प्रमुख मनिष जेठानी, डाँ विशाल येडे, गावंडे सर, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शिवजयंती ला सहकार्य छत्रपती श्री शिवाजी महाराज जन्मोत्सव समिती सरदार पटेल वॉर्ड वरोरा चे समस्त सदस्य, माजी नगरसेवक दिनेश यादव,अमोल माकुलवार, सोनु लिगाडे, अनिल कुंकूले,गजानन कोथडे, सचिन झरे, आदित्य सुनील वरखडे,रवी शिंदे, देवा वाटकर, आकाश गायकवाड, यशवंत गायकवाड, शरद यादव, गणेश चिडे,सोनु पित्तलवार, जन्मोत्सव समिती चे समस्त सदस्यांनी केले.
त्यावेळी शिवजयंतीला वरोरा शहरातील शिवभक्त उपस्थित होते..
Discussion about this post