
किरण पाठक अमळनेर..
अमळनेर :
नागरिकांनो उन्हाळा आला असून लग्नसमारंभ किंवा विविध कार्यक्रमात तुम्ही जार मधील थंड पाणी पित असाल तर तुम्ही गोड विष तर पित नाहीत ना ? याची खात्री करा. पाण्याचा फ्रिझिंग पॉईंट कमी करण्यासाठी त्यात इथिलीन ग्लायकॉल टाकले जात असल्याचे उघडकीस आले आहे..
लग्न समारंभ , सार्वजनिक कार्यक्रम , आणि उन्हाळ्यात पाणपोई वर आता सर्वत्र सर्रास थंड जार चे पाणी वापरले जात आहे. एकेकाळी समाजसेवा म्हणून मोफत वाटण्यात येणारे पाणी आता विकले जात आहे. अनेकांनी पाणी विक्रीचे व्यवसाय सुरू केले आहेत. त्यात उन्हाळा आल्याने मागणी वाढते आणि पाणी थंड होण्यासाठी मर्यादा येते. त्यामुळे काही व्यवसायिकांनी मागणी पूर्ण करण्यासाठी आणि पाणी थंड करण्यासाठी होणारी वीज कपात करण्यासाठी रासायनिक मात्र घातक उपाय शोधून काढला आहे. इथिलीन ग्लायकॉल नावाचा रासायनिक पदार्थ खूप साऱ्या पाण्यात टाकल्यास पाण्याचा गोठणबिंदू खालावतो. क्षणात पाण्याचे तापमान खाली येऊन पाणी थंड होते. अशा प्रकारचे थंड पाणी पिण्यास योग्य वाटते पण नंतर गरम झाल्यावर त्या पाण्याची चव बिघडते. पाणी पिल्यानन्तर घसा धरणे ,मळमळ ,उलटी असे प्रकार देखील होत आहे. इथिलीन ग्लायकॉल विषारी आणि घातक असल्याचे निदर्शनास आले आहे..
Discussion about this post