
सिद्धटेक येथे दशक्रिया विधीसाठी सर्व सुविधा
– समाजसेवक सोमनाथ भाऊ खोमणे यांचा पुढाकार
सिद्धटेक, कर्जत (अहिल्यानगर ): भीमा नदीच्या काठावर, सिद्धटेक येथे दशक्रिया विधीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. धार्मिक विधींसाठी आवश्यक साहित्य, ब्राह्मण काका, प्रवचनकार, स्पीकर, पत्रावळी, हार-फुले, तसेच स्नानासाठी लागणाऱ्या वस्तूंची येथे सोय करण्यात आली आहे.
समाजसेवक सोमनाथ भाऊ खोमणे यांच्या सहकार्याने मोफत पाण्याचे जार, तळवट व खुर्ची यांची सोय देखील करण्यात आली आहे, जेणेकरून विधी पार पाडण्यासाठी येणाऱ्या कुटुंबीयांना कोणतीही गैरसोय होणार नाही. “समाजसेवा हीच ईश्वरसेवा” या तत्त्वावर आधारित हा उपक्रम राबवला जात आहे.यावेळी सोमनाथ भाऊ खोमणे यांनी सांगितले की, “लोकांच्या दुःखात मदत करणे हेच सगळ्यात मोठे योगदान आहे.” त्यामुळे दुःखित कुटुंबांना आधार मिळावा आणि त्यांना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रमुख सुविधा:
✔ ब्राह्मण काका व प्रवचनकार
✔ धार्मिक विधींसाठी साहित्य
✔ स्पीकर व ध्वनीप्रक्षेपण व्यवस्था
✔ हार, फुले, पत्रावळी, पाणीबॉटल
✔ पोषाख, टोप्या, फरसाण आणि विधीसाठी साहित्य
✔ चहा, पोहे आणि भोजनाच्या ऑर्डर उपलब्ध
✔ मोफत पाण्याचे जार, तळवट व खुर्ची व्यवस्था
सोयीस्कर आणि नियोजनबद्ध सेवा
दशक्रिया विधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा विधी असून, तो संपूर्ण शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी या सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
विशेषतः
विधीमध्ये सहभागी असणाऱ्या कुटुंबांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीचा सामना करावा लागू नये, यासाठी येथे नियोजनबद्ध सेवा देण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क साधा: 9595328332
“समाजसेवा हीच ईश्वरसेवा” – समाजसेवक सोमनाथ भाऊ खोमणे

Discussion about this post