
आज नागसेन बुद्ध विहार आल्लापल्ली येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष कोरडे साहेब, व सचिव हंसा रामटेके तथा प्रमुख पाहुणे म्हणून जुंघरे ताई,वाळके ताई उपस्थित होते.प्रा. तावाडे सर यांनी मार्गदर्शन केले. भारतामध्ये महिलांची स्थिती आज अतिशय अस्वस्थ करून टाकणारी आहे असे वाटते त्याच प्रमाणे ज्या भारतात महिलांना देवीची उपमा दिली जाते तीच महिला किती सुरक्षित आहे याचा विचार करावा लागतो.वाढत्या महिलांवरील अत्याचारांच्या घटना याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निकिता बोरकर तर आभाप्रदर्शन संगीता तावाडे यांनी केले.याप्रसंगी
आल्लापल्ली येथील महिला उपस्थित होत्या..
Discussion about this post