
उदगीर/कमलाकर मुळे :
ग्रामपंचायत कार्यालय किनीयल्लादेवी येथे आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, त्याग मुर्ती माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर ग्रामपंचायत सदस्य गुणवंराव बिरादार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी अंगणवाडी कर्मचारी कमल जाधव, संगिता बिरादार, प्रभावती वाघमारे, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक व्यंकटराव कुंडगीर सहशिक्षका ज्योती माळकुट्टे /राजे , मंडोधरी सुरनर सी. आर.पी. दिपा मोगले ,शिल्पा कांबळे सुवर्णा केदासे , अभिलाषा कांबळे, संदेश कांबळे, ग्रामपंचायत कर्मचारी उमाकांत मुळे रोजगारसेवक संग्राम बिरादार रणवीर कांबळे राष्ट्र माझा न्यूज चॅनलचे संपादक नागनाथ ससाने कलापंढरी संस्थेचे समुह संघटक संदीप सोमवंशी आदि ग्रामस्थांनी महिला दिनानिमित्त अभिवादन केले. ग्रामपंचायत कार्यालय किनी य.च्या वतीने उपस्थित सर्व महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यंकटराव कुंडगीर सर यांनी केले तर आभार ज्ञानोबा किर्तीकर यांनी मानले. 💐🙏
Discussion about this post