प्रतिनिधी:- देवेंद्र यादव
जागृत नागरिक महासंघाने गुरुवार दिनांक 6/3/25 रोजी चिंचवडगाव पोस्ट ऑफिसला भेट देऊन सदर कार्यालयाने माहिती अधिकार कायदा कलम 4 बाबत सतरा मुद्द्यांची अंमलबजावणी झाली का नाही याची पाहणी केली. पाहणी दरम्यान सदर कार्यालयामध्ये माहिती अधिकाराबाबत सावळा गोंधळ असल्याचे निदर्शनास आले नितीन यादव आणि सदस्यांनी पोस्ट समन्वयक श्रीयुत नितीन बने यांच्यासोबत पोस्ट ऑफिसची चांगलीच झाडाझडती घेतली या ठिकाणी माहिती अधिकार कलम चार नुसार कुठेही जन माहिती अधिकारी अपील अधिकारी सहाय्यक जन माहिती अधिकारी यांच्या नावाचा फलक लावलेला दिसला नाही शिवाय कर्मचाऱ्यांची एकत्रित निर्देशिका /वेतन फलक/ तसेच प्रत्येक टेबलावर कर्मचाऱ्यांचे नाव आणि पद असलेला फलक दिसून आला नाही शिवाय शासन आदेशानुसार सदर पोस्ट ऑफिस मध्ये एकाही कर्मचाऱ्यांनी आपले ओळखपत्र आपल्या गणवेशावर अथवा गळ्यात लावलेले नव्हते ही अत्यंत गंभीर बाब आहे तसेच या ठिकाणी हालचाल बुक उपलब्ध नाही तसेच डेड स्टॉक रजिस्टर चा पत्ता नाही शिवाय या ठिकाणी इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट रिपोर्ट /फायर ऑडिट रिपोर्ट तसेच लेखापरीक्षण अहवालाची प्रत दिसून आली नाही अभिलेखांचे व्यवस्थित जतन दिसून आले नाही महत्त्वाचा म्हणजे माहिती अधिकार अर्जाबाबत येथे कुणाला कसलेच घेणे देणे नाही कारण माहिती अधिकार अर्जाचे जतनच करत नसल्याचे येथे दिसून आले येथे 26/11/ 2018 च्या शासन आदेशानुसार दर सोमवारी दुपारी तीन ते पाच अभिलेख अवलोकनाची व्यवस्था नाही नागरिकांना बैठक व्यवस्था नाही पिण्याचे पाणी कुठे आहे हे समजत नाही शिवाय याठिकाणी स्वच्छतागृह असल्याबाबत नागरिकांनाही माहीत नाही
सदर भेटीमध्ये संस्था अध्यक्ष नितीन यादव सचिव उमेश सनस सदस्य राजेंद्र कदम प्रकाश पाटील साहेबराव चौधरी व ताठे उपस्थित होते
Discussion about this post