वरोरा तालुका प्रतिनिधी :- उमेश कोटकर
तहसीलदार राजेश भांडारकर ऍक्शन मोडवर…
अवैध्यरित्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली शनिवारला रात्रीच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील किन्हाळा नाल्यावरून अवैध रेती वाहतूक कोकेवाडा धानोली शेत शिवार रस्त्यावर ट्रॅक्टर क्र. एम. एच. २९ टी. सि. ४१७५ किन्हाळा, कोकेवाडा, धानोली घाटावरून अवैध रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कोकेवाडा गावाजवळ ट्रॅक्टरला पकडून कारवाई केली आहे. अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले. सदर एक ट्रॅक्टर धानोली येथील आशिष ज्ञानेश्वर खाडे यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले जात आहे. ही कारवाई भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक तलाठी गोविंदा सेलोटे, तलाठी खुशाल मस्के, मंडळ अधिकारी अनिल दडमल, निर्दोष फुलबोगे, नितिन बुचुंडे कोतवाल यांनी केली….
Discussion about this post