सातारा (अनिलकुमार कदम प्रतिनिधी)
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय सातारा व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा व निर्माण बहुउद्देशीय संस्था सातारा याच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती सांगता समारोप कार्यक्रम विधी सेवा प्राधिकरण येथील सभागृहात अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. कार्यक्रमास दिवाणी न्यायाधीश आर. आर. मावतवाल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा येथील अमृता काटे, बाल कल्याण समिती सदस्य श्रीमती स्वरूपा पोरे हे उपस्थित होते. न्या.आर.आर.मावतवाल स्त्रियांच्या सबलीकरणा विषयी बोलताना म्हणाले, महिला सबला असतातच फक्त त्यांना स्त्री शक्तीची जाणीव करून देणे गरजेचे असते. महिलांना दैनंदिन अडथळ्यांना सामोरे जाऊन पुढे कसे जाता येईल या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच सविधानांने सर्वांसाठी जसे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्य देखील प्रदान केलेले आहेत, स्त्रियांनी दिलेल्या कायद्याचा वापर हा स्वतः च्या संरक्षणासाठी करावा, परंतु कायद्याचा दुरुपयोग करू नये याबद्दल उत्तम मार्गदर्शन केले. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अमृता काटे विधी सेवा प्राधिकरणाबद्दल, विविध कायद्यांबाबत माहिती दिली. गरजू महिलांना मोफत कायद्याची मदत कशी मिळते याबाबत कायदे विषयक मार्गदर्शन केले.
बाल कल्याण समिती येथील सदस्य स्वरूपा पोरे यांनी बाल कल्याण समिती बद्दल व बालकांसाठीच्या योजनांबाबत माहिती दिली. तसेच निर्माण संस्था मधील विक्रांत मोरे व सायली पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेच्या दशक पूर्तिनिमित योजनेची शपथ चाईल्ड लाईन मधील शिवानी गवंडी यांनी दिली. सूत्रसंचालन सरंक्षण अधिकारी अजय सपकाळ यांनी केले. प्रास्ताविक ज्योती जाधव समुपदेशक यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी
सुजाता देशमुख यांनी केले.
Discussion about this post