प्रतिनिधी:- जयराम मस्के
आजच्या अधिवेशनात राज्य सरकारने युवकांसाठी एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री मा. एकनाथरावजी शिंदे यांनी 2 वाजून 2 मिनिटांनी आपल्या भाषणात, तर मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी 2 वाजून 16 मिनिटांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेला पाच महिन्यांची मुदतवाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला!
ही योजना तरुणांना व्यावहारिक अनुभव मिळावा, त्यांना रोजगाराच्या संधी अधिक सुलभ व्हाव्यात आणि त्यांची क्षमता विकसित व्हावी, यासाठी राबवली जाते. अनेक प्रशिक्षणार्थी योजनेच्या मुदतीनंतरही अधिक संधीसाठी प्रतीक्षा करत होते. त्यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हा सकारात्मक निर्णय घेतला असून, यामुळे हजारो युवकांना मोठा दिलासा मिळेल.
मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार!
युवा पिढीच्या भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय निश्चितच प्रेरणादायी आहे. सर्व प्रशिक्षणार्थींना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
-प्रदिप मोरे
Discussion about this post