ता खुलताबाद
भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका,
कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. त्याचप्रमाणे आज शासकीय माध्यमिक आश्रम शाळा तिसगाव शाळेत जागतिक महिला दिन नियोजित केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती खेडकर /वारे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्रीमती जोशी मॅडम व आवर्जून उपस्थित असलेले शाळेचे मुख्याध्यापक श्री कटारे सर व सुत्रसंचलन श्री सोनकांबळे सर यांनी केले.जागतिक महिला दिनानिमित्त श्री कटारे सर, श्री खालापुरे सर, श्रीमती खेडकर/वारे मॅडम, श्री ठाकुर सर व विद्यार्थ्यांना , विद्यार्थीनींना जागतिक महिला दिनाचे महत्त्व,महिलांचे अधिकार,हक्क, अत्याचार.व विविध मुद्द्यांवर भाषण केले.त्याचबरोबर शाळेतील सर्व महिलांना, विद्यार्थीनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच श्री डोंगरे सर,कांबळे सर ,माळी ताई,उमेश राठोड सर,गावंडे सर,वैभव दादा, शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
तालुका प्रतिनिधी सनिराम गावंडे
Discussion about this post