प्रतिनिधी:- रोहित नागटिळक
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात सध्या गुंडा गर्दीचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे तालुक्यात ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे तसेच भूम हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची वर्दळ जास्त प्रमानात असते त्याचा च फायदा भूम येथे बरेच गुंड या शेतकऱ्यांना दमदाटी करणे मारहाण करणे त्यांच्याकडील पैसे काढून घेणे असे प्रमाण सर्रास वाढल्याचे पाहायला मिळत आहे.या गुंडाच्या भीतीने लोक ही तक्रार देण्यास टाळाटाळ करत आहेत जर पोलिस प्रशासनाने या गोष्टीवर लवकरच आळा न घातल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे त्यामुळे तालुक्यात वाढत असलेली गुंड गिरी रोखणे पोलिसांसाठी एक आव्हान झाले आहे.
Discussion about this post