ग्रुप ग्रामपंचायत सुकळी तालुका मुक्ताईनगर यांच्याकडून पंधरा वित्त आयोगाची मागासवर्गीयांचे भांडे ग्रुप ग्रामपंचायत सुकळी यांच्याकडून परस्पर बिले काढून मागासवर्गीय यांना भांडे न देता गहाळ करण्यात आली तरी शासन म्हणून मागासवर्गीय समाज हा अत्यंत गरिबीचा संकटातून जात असतो. शासन हे मागासवर्गीयांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असतात मात्र त्या मागासवर्गीयांपर्यंत पोहोचत नाही. आज मागासवर्गीय समाजाची अशी अवस्था आहे की ते कोणते प्रकारचे कार्य करत असताना लग्न समारंभाचे कार्यक्रम तसेच डॉक्टर बाबासाहेब जयंती यांचे कार्यक्रम करत असताना भांड्यांची कमतरता असते तरी महाराष्ट्र शासन हे मागासवर्गीयांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते.पण ते लाभार्थी तसेच समाजापर्यंत पोहोचत आहे की नाही याची सखोल चौकशी गाव पातळीवरून तसेच ग्रुप ग्रामपंचायत च्या माध्यमातून गटविकास अधिकारी यांचे असते तसेच ग्रामपंचायत सुकळी यांनी शासनाकडे चुकीची माहिती देऊन पंधराव्या वित्त आयोग तुन पैसे काढून परस्पर लुटले तरी माननीय गटविकास अधिकारी यांना सर्व मागासवर्गीय समाजाने निवेदन सादर केले आहे. त्यांच्याकडून स्पष्ट कार्यवाही संकेत देण्यात आली आहे.तसेच मागासवर्गीय समाज सुकळी यांच्याकडून सामाजिक न्याय विभाग यांना तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पण सदर प्रकरणाची प्रत दाखल करण्यात आली आहे. ज्यांनी कोणी मागासवर्गीय समाजावर अन्याय केलेला आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल तसेच मागासवर्गीय यांना भांडी देण्यात यावी ही मागणी गटविकास अधिकारी , मुख्य कार्यकारी अधिकारी कारवाई न झाल्यास तसेच सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांना निवेदन देऊन सदर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात येईल..
प्रतिनिधी प्रदीप सोनवणे,
9604030355..
Discussion about this post