
भराडी येथील श्रीमान अशोकदादा गरुड शैक्षणिक व सामाजिक समूह सिल्लोड संचलित, ज्ञानविकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
कर्तबगार महिलांचा सन्मान त्यांचे विचार,स्मरण यादिवशी केले जाते,प्रत्येक स्त्रीचा लढा हा आयुष्यभर सुरूच असतो.आपल्यावर येणारी संकटे,कुटुंबावर येणारी संकटे ही पेलताना प्रत्येक स्त्रीची दमछाक होत असते.असेच मागील वर्षी कन्नड तालुक्यातील पळशी खुर्द येथील शहीद जवान सोपान काळे यांना सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावत असताना बर्फ संकलन होऊन वीरमरण आले होते व काळे कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला.कुटुंबातील प्रमुख पुरुष व्यक्ती गेल्यावर सगळी जबाबदारी स्त्रीच्या खांद्यावर येऊन पडते आज वीरपत्नी मंदाबाई सोपान काळे यांना दोन वर्षाचा शिवांश नावाचा मुलगा आहे आणि शिवांश चे भवितव्य हे मंदाबाई यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.याप्रसंगी विद्यालयात हजर असता भावनाविवश होत मंदाबाई सोपान काळे यांनी परिस्थिती आणि जबाबदारी माणसाला सर्वकाही शिकविते असे सांगितले. या दिनानिमित्त घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत वैष्णवी जाधव,तेजस्विनी काकडे,देवयानी शेजुळ, अनन्या पाटील,भक्ती जाधव,पूनम कोलते,जयश्री सोनवणे, कर्तबगार महिला वेशभूषेत रोशनी भोजने,वेदिका गवळी,प्रांजल सोनवणे,श्रद्धा शेजुळ यांचा समावेश होता त्यांना शालेय साहित्य वाटप करून सन्मानित करण्यात आले.
सदरील कार्यक्रमात मंदाबाई सोपान काळे यांच्या हस्ते ज्ञानविकास विद्यालयात शिल्पाताई अशोकदादा गरुड, सौ चंद्रिका मधुकरराव देशमुख यांच्या सौजन्याने विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी (नॅपकिन) पॅड (ए.टी.पी) मशीनचा शुभारंभ करण्यात आला.
या मशीनचे फायदे स्पष्ट करताना विद्यालयाच्या सहशिक्षिका श्रीमती टाकळकर मुलींना स्वयंचलित मशीन द्वारे स्वच्छता,सक्षमता तसेच जीवाणूजन्य रोग आणि संसर्गापासून बचाव करण्यासाठी अगदी अल्प दरात पॅड उपलब्ध होऊन निश्चितच फायदा मिळेल असे सांगितले.
यावेळी वीरपत्नी मंदाबाई सोपान काळे यांच्या समवेत वडील रामेश्वर मख, होलीफेथ इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका श्रीमती राजश्री गौर,सारिका इंगे, संजना साकला,मोरे,ज्ञानविकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री रायभान जाधव ,सहशिक्षक वृंद यांची उपस्थिती होती..
Discussion about this post