
८१० कोटीचा उदगीर ते रावी – देगलुर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला*
उदगीर : यावर्षीची विधानसभेची निवडणूक ही माझी तिसरी निवडणुक होती. मात्र गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा या वेळेस आपण सर्वांनी प्रचंड मतांनी निवडून देवुन
जिल्ह्यात सर्वाधिक मते आपण मला दिली. तब्वल २ लाख मतापैकी १ लाख ५४ हजार मते मला मिळाली व रेकार्डब्रेक अशा ९३ हजार मतांनी मी विजयी झालो असलो तरी साडेतीन लाख सर्वसामान्य नागरिकांचा मी लोकप्रतिनिधी असल्याचे मत माजी क्रीडा मंत्री आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
उदगीर तालुक्यातील टाकळी येथे आयोजीत
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त दर्शन व नागरी सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
यावेळी धनाजी टाकळीकर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले, प्रा.श्याम डावळे, जळकोटचे भाजपा तालुकाध्यक्ष सत्यवान पांडे, देऊळवाडीचे सरपंच शुभम केंद्रे, दिगबंर टाकळीकर, गजानन टाकळीकर, सुखानंद बोईनवाड, मनोहर पाटील, कुशालगिर गिरी, पांडु पांचाळ, गणु महाराज जांबळवाड, रामराव मानकोळे, माधव पाटील, बालाजी बोईनवाड, संजु सगर, सीताराम दैठणे, बालाजी एकुंडे, बालाजी निलेवाड, दर्शन बोईनवाड, प्रशांत राठोड, गोविंद बोईनवाड, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.संजय बनसोडे यांनी, गेल्या ५ वर्षाच्या काळात मतदार संघाचा सर्वांगीण विकास केला असुन त्यामध्ये सर्व शासकीय इमारती, शहराला जोडणारे सर्व रस्ते हे राष्ट्रीय महामार्गाने जोडले, पिण्याचा पाण्याचा प्रश्न, विविध समाजाचे भवन, भुमीगत गटार, एम.आय.डी.सी. आदी मंजूर करुन उदगीरच्या विकासात मागील काळात भर टाकली असुन भविष्यात आपला उदगीर तालुका हा जिल्हा करण्याच्या दृष्टीने काम केले आहे. भविष्यात पिकविमा, अपंगाच्या समस्या, कोल्हापुरी बंधारे , शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्याही समस्या लवकरच सोडवणार आहे. ८१० कोटींचा उदगीर ते रावी – देगलुर हा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला असुन त्याचेही काम लवकरच सुरु होणार असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
यावेळी महिला दिनानिमित्त आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते ज्येष्ठ माता – भगिनींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अंबादास तुंकलवाड, विश्वनाथ भुनकवाड, अजय सगर, ज्ञानोबा शेळके, विलास अरदवाड, चंदर कारभारी, चंचळबाई निलेवाड, शेषाबाई तेलंगे, बायनाबाई चोपवाड, महादेवीबाई एलेवाड, सोमित्रा ऐलवाड, कस्तुराबाई करकाळे, अनुसयाबाई डिचमवाड आदीसह टाकळी गावातील व पंचक्रोशीतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post