यावेळी नूतन संचालक मंडळामध्ये पाटणे सचिन शरदचंद्र, जंगम निलेश नंदकुमार, महिमकर अमोल सुर्यकांत, पाटील धोंडिराम काकासाहेब, सुरवसे यतिराज भिमराव, श्रीमती तेली संध्या बाळकृष्ण, श्रीमती कटरे अर्चना अनंत, गायकवाड अमोल लक्ष्मण, कुंभार राजेंद्र लक्ष्मण, बेहेरे उत्तम जगन्नाथ यांची निवड झाली.यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था, सांगोला येथील ए.एस. पुजारी यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या काल झालेल्या पहिल्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये पतसंस्थेचे चेअरमन म्हणून प्राचार्य अमोल लक्ष्मण गायकवाड यांची एकमताने निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री.ए.एस.पुजारी साहेब यांनी जाहीर केले.या निवडीबद्दल नूतन चेअरमन व व्हा. चेअरमन यांचा सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म. शं. घोंगडे व संस्था सदस्य विश्वेश झपके यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.सदरची निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पणे पार पाडण्यासाठी पतसंस्थेचे सचिव श्री. उत्तम सोनलकर यांनी विशेष परिश्रम घेतले..
Discussion about this post