
परभणी प्रतिनिधी..ओमप्रकाश शर्मा…
9975375264
सामाजिक चळवळीत निस्वार्थपणे काम करणाऱ्या तसेच समाजाच्या सुखदुःखात स्वतःहून धावून जाणाऱ्या समाज प्रबोधन जागृती सामाजिक संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सो संगीता कचरे यांनी
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांनी कौशल्याने आणि जिद्दीने जगाला नवी दिशा दिली आहे. तरीही आज अनेक ठिकाणी महिला समानतेसाठी संघर्ष करावा लागतो .त्यांना शिक्षण आरोग्य आणि रोजगाराच्या संधी पासून वंचित ठेवले जाते. त्याच्यावर अन्याय आणि अत्याचार होतात ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी मिळून महिलांच्या हक्कासाठी आवाज उठवला पाहिजे. त्यांना समान संधी आणि सन्मान मिळून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आज या महिला दिनी आपण सर्वांनी एकत्र एक प्रतिज्ञा करूया आपण प्रत्येक महिलेचा आदर करू तिला समान संधी देऊ आणि तिच्या स्वप्नांना पाठिंबा देऊ कारण जेव्हा महिला सक्षम होतील तेव्हा एक सशक्त समाज निर्माण होईल.बालविवाह रोखणे विधवा प्रथा बंद करणे गरजेचे आहे.
व्यंकटेश नगर येथे इंटरनॅशनल युनियन फुड वर्कर्स (iuf)जागतिक संघटना तर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त 8 मार्च महिला दिनानिमित्त मार्गदर्शन करताना त्या बोलत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ पमाबाई गहिरे प्रमुख उपस्थिती डाॅ.नेहा कचरे,सौ.उमा कचरे सौ.यशोदा गहिरे सौ.निकीता आडे पल्लवी आडे या कार्यक्रमाचे नियोजन श्री.एल के कचरे अनिकेत कचरे प्रारंभी राजमाता जिजाबाई महाराणीच्या प्रतिमेचे पूजन केले या वेळी मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या..
Discussion about this post