
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
महत्वकांशी, होतकरू, सामाजिक आणि कौटुंबीक झुंज देणाऱ्या महिलांचा सन्मान “महिला दिनी” व्हायलाच पाहिजे. हा संकल्प येथील एनजीओ संस्था नंदीशा विंग्स फाऊंडेशनने घेतला. आणि गोरगरीब कुटुंबातील 36 कष्टकरी महिलांचा गौरव सन्मान जागतिक महिला दिनी ( 8 मार्च ) ला पार पडला. येथे सर्वांचे शाल श्रीफळ व प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले हे उल्लेखनीय.
जागतिक महिला दिनानिमित्त साकोली नगरपरिषद सभागृहात होतकरू व कौटुंबिक जीवनाशी झुंज देणा-या आणि खरंच मेहनती कर्तव्यदक्ष अश्या ३६ महिलांचा गौरव सन्मान कार्यक्रमाला प्रमुख अतिथी न. प. प्रशासकीय अधिकारी कल्याणी भंवरे, डॉ. परमानंद मेश्राम, पाणीपुरवठा अभियंता सचिन मेश्राम, उमेद व्यवस्थापक अश्विन बन्सोड, लेखापाल कामेश बोरझरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल मेश्राम ,ॲड. सुनिता भेंडारकर, प्रा. सोनाली क-हाडे, पत्रकार डि. जी. रंगारी आदी उपस्थित होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सत्कार याचा मुख्य उद्देश आहे की, आज गोरगरीब परीवारात असंख्य होतकरू, जीवनाशी झुंज देत आपला उदरनिर्वाह चालवित असणा-या कर्तव्यदक्ष महिलांचा खरंच गौरव सन्मान व्हायलाच पाहिजे. कारण अश्या कार्यक्रमाने त्या होतकरू गोरगरीब आणि सर्वसामान्य परीवारातील प्रत्येक महिलांची मान उंचावली पाहिजे व यातूनच आपल्या पाल्यांचे भविष्य कसे उज्वल होईल याची प्रेरणा नक्कीच मिळेल हा मुळ हेतू आहे असे नंदीशा विंग्स फाऊंडेशनच्या संचालिका नंदीनी शेंदरे यांनी सांगितले. भाषणात प्रशासकीय अधिकारी कल्याणी भंवरे ह्या म्हणाल्या की, आज प्रत्येक कष्टकरी महिलांना एकच संदेश की, जास्तीत जास्त बचतीची सवय लावा, व आपला कष्टाचा पैसा हा राष्ट्रीयकृत बँकेतच ठेवा, आणि आज आँनलाईन फसवणुकीपासून सावधान व नेहमी सतर्क रहावे असे प्रतिपादन केले. येथे अगदी सामान्य कुटुंबातील 36 कष्टकरी महिलांचा गौरव सत्कार करण्यात आला.
महिला दिनानिमित्त या अभिनव कार्यक्रमात संचालन नंदीनी शेंदरे यांनी केले. तर प्रास्ताविक दिलीप राऊत यांनी केले. येथे परीसरातील शंभराहून अधिक महिला आवर्जून उपस्थित झाल्या होत्या. शेवटी आभार प्रदर्शन एस. मिडीयाचे कार्तिक लांजेवार व फ्रिडमचे किशोर बावणे यांनी केले..
Discussion about this post