
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला..
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिता गजभिये व अंगणवाडी सेविका ममता ऊके उपस्थित होत्या. सर्वप्रथम त्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक अनिल खंडाईत यांनी प्रमुख पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्याध्यापक अनिल खंडाईत म्हणाले की,यांनी जागतिक महिला दिनाविषयी माहिती सांगितले की, महिलांची ताकद ही महिलाच असते. घरोघरी महिलांचा सन्मान होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर आदर्श व्यक्ती डोळ्यासमोर ठेवताना स्वतः आदर्शवत होणे गरजेचे असते. तरच आदर्श समाज घडतो, असे प्रतिपादन केले तर शिक्षिका दिपेश्वरी झोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.आनंददायी शनिवार अंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.’स्त्री शक्तीचा जागर ‘या गीतांनी कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर.ब्राम्हणकर यांनी केले. आभार प्रदर्शन मेघा लोथे यांनी केले. याप्रसंगी कापगते सर, ललिता कोडापे, पोर्णिमा पाऊलझगडे, जागृती गजभिये, अंगणवाडी सेविका पुष्पा ऊके यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते..
Discussion about this post