


प्रा. दिलीप नाईकवाड..
सिंदखेडाराजा /तालुका प्रतिनिधी,
श्री क्षेत्र पैठण येथील नाथ षष्ठी सोहळ्यात सामील होण्यासाठी हिवरा (खुर्द) येथून निघालेल्या पायदळ दिंडीचे आज सकाळी ९.०० चे सुमारास येथे आगमन झाले. येथील शिक्षक कॉलनीतील गजानन मंदिर प्रांगणात दिंडीतील भाविकांचे ह.भ.प.पंजाबराव महाराज बिलारी यांनी यथोचित पूजन करून भावभक्तीपूर्ण स्वागत केले.
हिवरा (खु.) येथून ता.७ रोजी दिंडी प्रमुख ह.भ.प.किरण महाराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व ह.भ.प.देवानंद महाराज शेळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निघालेल्या या दिंडीत ह.भ.प. गणेश बापू इंगळे हे विणेकरी आहेत.सोपानकाका देहूकर फडावरील मानाची दिंडीचा मान हिवरा येथील या दिंडीचा असून वै.ह.भ.प.दत्तात्रय महाराज पिसे यांनी ३७ वर्षांपूर्वी सुरू केलेली ही पायदळ दिंडीची परंपरा किरण महाराज शिंदे, गणेश बापू इंगळे व देवानंद महाराज शेळके आणि वारकरी मंडळी पुढे चालवित आहेत.हिवरा (खुर्द) येथून ता.७ रोजी प्रस्थान केलेल्या या दिंडीत -ह.भ.प.गजानन शिंदे, बोरकर -- सह १२५ स्त्री -पुरूष वारकरी सहभागी झाले असून मुक्काम दर मुक्काम वारकऱ्यांच्या संख्येत वाढ होणार आहे.
या दिंडीचा ता.७ रोजी पहिला मुक्काम पेनटाकळी येथे झाला असता ह.भ.प.गणेश बापू इंगळे व पेनटाकळीचे सरपंच पुंजाजी इंगळे यांनी दिंडीतील वारकऱ्यांचे भावभक्तीपूर्ण स्वागत केले.ता.८ ला साखरखेर्डा येथील माळीपूरा येथील मंदिरात दुसरा मुक्काम होऊन आज ता .९ रोजी सकाळी येथील गजानन महाराज मंदिर परिसरात आगमन झाले असता ह.भ.प. पंजाबराव महाराज बिलारी यांनी दिंडीतील वारकऱ्यांचे विधिवत पूजन करून भावभक्तीपूर्ण स्वागत केले .
.मुक्कामाचे ठिकाणी हरिपाठ,काकडा ,भजन , प्रवचन असे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. दुपारी १२.३० चे दरम्यान दिंडी मलकापूर -पांग्रा कडे पुढील मुक्काम कडे रवाना झाली.ही दिंडी पुढे किनगाव राजा, सिंदखेडराजा, जालना,अंबड,पाचोड मार्गे नाथ षष्ठी चे दिवशी ता.२० रोजी पैठण येथे सोपानकाका देहूकर फडावरील मानाच्या दिंडीत सहभागी होणार आहे..
Discussion about this post