

शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
महिला आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कष्ट घेतात. हे करीत असताना महिलांनी आपली स्वतःची काळजी घेणे तेवढेच महत्वाचे आहे. असे वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तनुजा नागदेवे यांनी केले. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी या गावात जागतिक महिला दिनाच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा तनुजा नागदेवे,माया रामटेके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली.
पुढे बोलताना तनुजा नागदेवे म्हणाल्या की,
घेऊन येते प्रेम माया ममता
या अवनी वरती जन्मा येता !
होऊन मुलगी पत्नी आई आजी
सासर माहेर ची करी काळजी !!
स्वतःची इच्छा मारून
संसाराच्या गाडा हाकते !!
कुटुंबाची दुःख कवटांळुन
सर्वांना सुखाची उब देते !!!!
कुठेही केव्हाही कोणालाही
जीव विव्हळत असेल तरी !!!
मा जिजाऊ अहिल्या सावित्री रमा भिमाई होऊनी सदा
होतेच हळवी तू खरी ,!!!!!
असे उद्देश त्यांनी आपल्या भाषणात मांडला आहे.आजच्या घडीला महिलावर रोजच अत्याचार होत आहेत तरी पण सरकार पाऊल उचलत नाही. राज्यातील महिला,मुलीवर बलात्कार होत आहेत मात्र फडणवीस सरकार ठोस निर्णय घेत नाही. पुणे मध्ये स्वारगेट किंवा भंडारा मधील एक वकील अकरा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करतो अशा नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली पाहिजे असे मत जिल्हा अध्यक्षा तनुजा नागदेवे यांनी आपल्या भाषणातून मांडले. कार्यक्रमाला मायाबाई रामटेके ,गीता वलथरे, काजळ खंडाळे, रजणी बोंबाडे, सेविका जांबुळकर, कविता जांभुळकर ,सुकेशिनी रामटेके ,सोनल बोरकर, वंदना चंद्रिकापुरे, दीक्षा चारुशीला मेश्राम ,भीमा खोब्रागडे, सुशिला लांडगे, लीला जांभुळकर, महानंदा वाहने, सुनिता उके, मेघा डोंगरवार, शिल्पा पाटील यांच्या सह बहुसंख्येने महिला उपस्थित होत्या..
Discussion about this post