
अंबाजोगाई प्रतिनिधी,
अंबाजोगाई येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी मा.झेड.झेड.खान साहेब यांच्या न्यायालयाने आरोपी कैलास जिजाराम गडदे याची निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड.आर.एम.धायगुडे यांनी काम पाहिले,प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की प्रकरणातील फिर्यादी याने पोलीस स्टेशन अंबाजोगाई (ग्रा.) येथे येऊन फिर्याद दिली की 15/05/2022 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास मी आमच्या गावात चिचखंडी येथे आहील्याबाई चौकात थांबलो आसताना माझा चुलत भाऊ कैलास जिजाराम गडदे हा तेथे आला व मला म्हणाला की, शेतातील वाटणीच काय झाल त्यावर मी म्हणालो आपण आपसात सर्व बसुन एखाद्या दिवशी मार्ग काढु परंतु कैलास जिज़ाराम गडदे हा म्हणाला तुझी आत्ताच बघायची आहे असे म्हणुन शिविगाळ करुन दगड डोकीत मारुन जखमी केले त्यावेळी जवळच आसलेले माझे चुलत भाऊ व चुलत पुतण्या दोघेजण आमचे भांडण पाहुन तेथे आले व त्यांनी भांडणाची सोडवासोडव केली अशा आशयाची फिर्यादीने फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गु.र.क्र.112/2022 कलम 324,504,506, भा.द.वि.प्रमाणे दाखल झाला. प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी आरोंपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.सरकारी पक्षातर्फे प्रकरणात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.आलेल्या पुराव्यावरून व दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून मा.न्यायालयांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.आरोपीच्या वतीने ॲड.आर.एम.धायगुडे यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड.जी.डी.कांदे,ॲड.डी.ए. लोंढाळ,ॲड.अविनाश धायगुडे.ॲड.ओ.ए.लोंढाळ ॲड.दयानंद गडदे,ॲड.पी.पी.धायगुडे यांनी सहकार्य केले..
Discussion about this post