
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
येथील ग्रामपंचायत कार्यालयात 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सरपंच पोर्णिमा चांदेवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष महिला सभा आयोजित करण्यात आली होती.
या वेळी राजमाता जिजाऊ माता, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. या सभेसाठी उपसरपंच सत्यभामा नेवारे, शिक्षिका दिपेश्वरी झोडे, आरोग्य सेविका परशुरामकर, ग्रा.प.सदस्या रेखा रामटेके, कविता कोल्हे, लिना चांदेवार, रागिणी दोनोडे, अंगणवाडी सेविका दर्शना चांदेवार, ममता ऊके, आशा वर्कर्स दिपाली मोटघरे, ललिता कोडापे, अंगणवाडी मदतनीस, बचत गट प्रतिनिधी, बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा गुलाब पुष्प देऊन महिला दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले तसेच सरपंच पोर्णिमा चांदेवार यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली. यावेळी शिक्षिका दिपेश्वरी झोडे,ग्रा.प.सदस्या रेखा रामटेके, अंगणवाडी सेविका दर्शना चांदेवार यांची महिला दिनानिमित्त भाषणे झाली..
Discussion about this post