मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे
मानोरा : गव्हा येथे कल्पतरु महिला मंडळ यांच्याकडुन स्वच्छता मोहीम राबवून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन केक कापन्यात आला यावेळी कल्पतरु बचत गट महीला मंडळाची उपस्थीती होती .
सोनिया आंनद देशमुख यानी आपले मनोगत व्यक्त करतांना भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971 ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका,शासकीय कार्यालय ग्राम पंचायत कार्यालयांमधूनही 8 मार्च साजरा व्हायला लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना दिसून येतो. त्याचप्रमाणे आज ग्राम पंचाय कार्यालय कल्पतरु महिला मंडळ मुख्यालय गव्हा येथे जागतिक महिला दिन साजरा केला. सर्व महिलांनी, महीलांनी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या कल्पतरु महीला मंडळ उपस्थित होते.

Discussion about this post