
प्रतिनिधी :- प्रमोद जमादार (7775887153)
शिरपुरात आक्रोश मोर्चा पोलीस निरीक्षक केके पाटलांचे का झाले निलंबन…..?
शिरपूरकरांचा पोलीस निरीक्षक केके पाटील यांच्याविरुद्ध आक्रोश नेमके का वाढला आहे ? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या कोथळा काढण्याच्या पोस्टवरून नेमके काय झाले शिरपुरात झालेल्या या प्रकरणाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊ. दिनांक 7 मार्च रोजी वनावल येथे एका हिंदू युगाने छत्रपती शिवाजी महाराजांची अफजलखानाचा कोथळा बाहेर काढण्याची पोस्ट इन्स्टाग्राम वर केली होती. त्याच पोस्टला प्रत्युत्तर देत काही मुस्लिम तरुणांनी हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतील अशा आक्षेप आहार्य कमेंट्स त्या पोस्ट वरती केल्या म्हणून हिंदुत्ववादी संघटनांनी त्या विरोधात प्रांत अधिकारी व शिरपूर पोलीस निरीक्षक यांना सात तारखेला दुपारी निवेदन दिले.व सायंकाळी ह्याच घटने प्रकरणी ह्या तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत वनावल येथील सहा तरुणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर लागली तत्परतेने के के पाटील यांच्या सहकार्यांनी त्यांनी अटक केली. पण पोलीस स्टेशनवर जमा वाढत असल्याकारणाने हिंदुत्ववादी संघटनांचा जमाव झाल्याने त्यांना पांगविण्यासाठी एका तरुणास मारहाण करण्यात आली.हे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. जमलेल्या सगळ्या तरुणांनी त्या तरुणास उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ह्याच कारणावरून रात्री सगळ्याच हिंदूवादी संघटनांनी के के पाटील यांच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढायचं ठरवलं. आणि दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान हजारो योग शिरपूर शहरातील चोपडा जिन येथे जमत त्यांनी के.के.पाटील व पोलीस प्रशासनाच्या विरुद्ध मोर्चा काढीत शिरपूर पोलीस स्टेशन गाठले. मिळालेली विश्वासनीय माहितीनुसार के.के. पाटील यांचे निलंबन झाले असून त्यांच्या जागी सांगवी. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. तेथे हे प्रकरण पुढे काय वळण घेते हे बघणे अवचुक्याचे ठरणार आहे….
Discussion about this post