
रांजणगाव गणपती,
प्रतिनिधी : बाळासाहेब कुंभार..
येथील मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेतील इयत्ता१० वी सन१९८५-८६ चे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी ४०वर्षांनी पुन्हा एकत्र आले.हा कार्यक्रम जय मल्हार कृषी पर्यटन, मोराची चिंचोली ता. शिरूर येथे उत्साहात पार पडला.
स्नेह मेळाव्याला५१माजी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात नवचैतन्य हास्य परिवार (पिंपळे गुरव )यांच्या हास्य व्यायामाने झाली नंतर शाळेतील प्रार्थना म्हणजे सरस्वती वंदना प्रतिज्ञा इ.झाल्यानंतरआलेल्या सर्व गुरुजनांचे स्वागत संयोजन समितीने फेटा शाल व आकर्षक भेटवस्तू देऊन करण्यात आले .बॅचच्या दिवंगत शिक्षक व माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नंतर सर्वांनी आपला परिचय करून दिला व पुन्हा एकत्र येण्याचा मानस व्यक्त केला
शिरूर तालुक्यातील अष्टविनायकापैकी एक असलेल्या गावात सन१९८५-८६बॅचमधील मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येत एकत्र येण्याचे ठरले. स्नेह मेळाव्यामध्ये प्रशालेत शिकवणाऱ्या गुरुजनानी देखील उपस्थिती दर्शविल्याने कार्यक्रम आणखीन रंगतदार झाला.कार्यक्रमासाठी सुदाम तोडकर, दत्तात्रय भुजबळ ,मारुती घुगे, सौ शुभांगी जांभेकर ,नंदकुमारअनारसे कला अध्यापक सतीश राठोड ,नरेंद्र व्यवहारे ,पर्यवेक्षक सुभाष पाचकर तसेच प्रकाश थोरात या गुरुजनांनी हजेरी लावली.
जागतिक महिला दिन निमित्त महिला भगिनींसाठी सरकार फिल्म प्रस्तुत कोण जिंकणार पैठणी हा विराज शिंदे -सरकार यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाने खूपच रंगत आणली.
शाळेतील मस्ती, एकत्र केलेला अभ्यास ,शिक्षकांचा वचक ,शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकाने दिलेली शिक्षा स्नेहसंमेलनातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा अनेक विविध विषयांवर गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच केक कापून सर्वांनी आनंद साजरा केला.उपस्थित सर्वांनी स्नेह भोजनाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुहास वाळके, स्वागत रविंद्र आबनावे आणि सूत्रसंचालन प्रा . मारुती घुगे सर यांनी पार पाडले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्वला चोरडिया -कर्नावट ,राजेंद्र शेलार बबनराव कुटे, किसनराव बत्ते ,मनोहर कांबळे, रामदास पाचंगे,चंदा हिरवे संगीता पडवळ सह सर्व माजी विद्यार्थी /विद्यार्थिनी यांनी विशेष प्रयत्न केले.
चौकट :४० वर्षानंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने (माहेरी )आलेल्या महिला भगिनींना साडीचोळी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले व महिला भगिनींनी सुद्धा आपल्या वर्ग बंधूंना एक आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान केला व सर्वांसाठी एक वेगळाच आदर्श घालून दिला..
Discussion about this post