
अमळनेर प्रतिनिधी –
महिला दिनाच्या अनुषंगाने पूज्य साने गुरुजी माध्यमिक शिक्षक व इतर नोकरवर्गाच्या सहकारी पतसंस्थेच्या मासिक सभेमध्ये पत संस्थेच्या दोन्ही पदांवर अनुक्रमे मानद सचिव पदी सविता आहिरे (बोरसे) व खजिनदारपदी प्रा. मंदाकिनी भामरे यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये अध्यक्ष सुशील भदाणे, उपाध्यक्ष महेश नेरपगारे, संजीव पाटील, सचिन साळुंखे, राजेंद्र पाटील ,आशिष शिंदे, प्रमोद पाटील ,प्रतिभा जाधव, संजय पाटील, व्यवस्थापक सागर पाटील ,अजय पाटील, रवींद्र पाटील, स्वप्निल पाटील ,विपिन पाटील उपस्थित होते. या निवडीबद्दल माध्यमिक पतपेढी जळगाव संचालक तुषार बोरसे यांनी अभिनंदन केले..
Discussion about this post