प्रतिनिधी :-
सदर घटना दि. 9/3/2025 ला मध्यरात्री 1.56 ते 2.15 या दरम्यान वर्धा शहरातील प्रताप नगर, तुकडोजी ग्राउंड जवळ जुन्या तुकडोजी शाळेच्या बिल्डिंगमध्ये घडली. येथे युनिक ग्रुप च्या ऑफिसमध्ये चोरी करण्याच्या उद्देशाने दरवाजाचे लॉक तोडण्याकरिता चोरटे हातात दगड घेऊन आले आणि CCTV कॅमेरे असल्याचे लक्षात येताच दगड फेकून दिले आणि CCTV कॅमेरा पळवला. नंतर दुसरा पण कॅमेरा असल्याचे लक्षात आल्यानंतर थोड्याच वेळात चेहरा कापडाने झाकून आले आणि दुसरा पण CCTV कॅमेरा काढून चोरट्याने पळविला.
तोपर्यंत ही घटना कॅमेऱ्याच्या मेमरी कार्ड मध्ये सेव झाली आहे हे या भामट्या चोरट्यांना कळलेच नाही. परंतु CCTV कॅमेरे असल्याने चोरीची घटना घडली नाही व कुठलेच नुकसान झाले नाही. तुकडोजी ग्राउंड मध्ये रात्री दारू पिणारे आणि नशा करणारे व्यक्ती बेभान स्वरूपात असतात आणि आता ग्राउंड चांगले झाल्यानंतर यांचे प्रमाण खूप वाढले आहे. करिता आम्ही शहरातील नागरिकांना व संपूर्ण व्यवसायिकांना अशा प्रकारच्या चोरट्यांपासून सावध राहण्याची विनंती करतो. तसेच शहरातील पोलीस विभागाला अशा प्रकारच्या घटने करीता योग्य ते नियोजन करण्याकरिता विनंती करीत आहोत.
Discussion about this post