
उदगीर (श्रीधर सावळे )
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात युवती मार्गदर्शन व प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीच्या सदस्या डॉ.मनीषाताई वाडियार तर प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.प्रीती येरनाळे उपस्थित होत्या.
याशिवाय मंचावर महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर व उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे यांची उपस्थिती होती. सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वर्षा निरगुडे यांनी तर पाहुण्यांचा परिचय प्रा.जे.डी.संपाळे यांनी करून दिला.
प्रमुख मार्गदर्शक डॉ.प्रीती येरनाळे म्हणाल्या, महिलांचा सर्वांगीण विकास हा त्यांच्या आर्थिक, शारीरिक आणि मानसिक विकासावर अवलंबून असतो. केवळ महिला दिनीचं महिलांचा सन्मान करून चालणार नाही, तर ही आदराची भावना सतत असणे गरजेचे आहे. यावेळी आरोग्याच्या प्रश्नांशी निगडित विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिली. अध्यक्षीय समारोप डॉ.मनीषाताई वाडियार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.यु.एस.धसवाडीकर, डॉ.एस.एस. बिरादार, डॉ.एस. डी. लोहारे, प्रा.निता हाके यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ.एल.एम.कमलापुरे तर आभार डॉ.सुचिता पाटील यांनी मानले.
Discussion about this post