
लोहा प्रतिनिधी………………….
लोहा तालुक्यातील असलेल्या अंतेश्वर बंधाऱ्यावर उपसा सिंचन योजना मंजूर करून ,लोहा तालुक्यातील गावांना पाणी उपलब्ध करून द्यावे .हे पाणी दुसऱ्या जिल्ह्याकडे न जाऊ देता ,येतील बळीराजाला त्याच्या हक्काचे पाणी मिळावे .यामुळे येथील 27 गावी ओलिताखाली येऊन त्यांच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट होईल आणि त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी उपलब्ध होईल. यासाठी आज छत्रपती संभाजी नगर येथे गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या संचालकाची भेट घेऊन माजी आमदार शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे व अंतेश्वर कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे ,कृती समितीचे अध्यक्ष माजी सभापती संजय पाटील कराळे, माजी पंचायत समिती सदस्य माधवराव चांदणे ,अशोकराव सोनवणे सरपंच संदीप पाटील पौळ,आडगाव चे पोलीस पाटील विश्वंभर क्षीरसागर ,कृती समितीचे सचिव अजय हंकारे ,चंद्रकांत एकलारे आदी मान्यवर उपस्थित होते..
Discussion about this post