
अतुल पवळे खडकवासला प्रतिनिधी..
8 मार्च महिला दिन व क्रांतिज्योती सवित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोंढणपूर येथे पुणे येथील संजीवन फॉउंडेशन, केअर टेकर सोसायटी, दिनकरराव जावळकर प्रतिष्ठान आणि कोंढणपूर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उदघाटन सरपंच पल्लवी सुदर्शन जरांडे आणि उपसरपंच धनंजय मुजुमले यांचे हस्ते करण्यात आले. डॉ सुनिलकुमार थिगळे, कुमार शिंदे आणि डॉ हेमा थिगळे यांनी उपस्थित नागरिकांना आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. या शिबिरात 250 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. फाल्गुनी जपे यांनी त्यांची डोळे तपासणी, डॉ. स्मितल कुलकर्णी यांनी हिमोग्लोबिन, रक्तदाब आणि शुगर तपासणी, डॉ सुरेश निघोट यांनी लहान मुलांची तपासणी आणि स्त्री रोग तज्ञ् डॉ अजिता निघोट आणि डॉ. रितू दवे यांनी महिलांचे आरोग्य व स्तनाचा व गर्भाशयाचा कर्करोग याची तपासणी केली.दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि धोंडूमामा साठे महाविद्यालय येथील डॉक्टरांनी सहभाग या शिबिरात रुग्णांची तपासणीसाठी घेतला. अनेक महिलांमध्ये हिमोग्लोबिन चे प्रमाण कमी असल्याचे आढळले.
या प्रसंगी मा. पंचायत समिती सदस्य नितीन वाघ, रवी मुजुमले, अरुण घोगरे, मुकुंद मुजुमले,सुदर्शन जरांडे, शेखर मुजुमले, मारुती मुजुमले,
रणजीत परदेशी,अमोल अरगडे, विजय बेलीटकर, संजय असरकर,आकाश यादव, अमित चव्हाण, संतोष जाधव, रामदास गायकवाड, राजेंद्र मुजुमले, अमोल मुजुमले, राजेंद्र चोरघे, पप्पू अण्णा गायकवाड, निवृत्ती वाव्हळ, वर्षाताई मुजुमले हे उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमार शिंदे यांनी केले तर उपसरपंच धनंजय मुजुमले यांनी आभार मानले..
Discussion about this post