


पेण तालुक्यातील धक्कादायक गुढ हत्या प्रकरण समोर आले आहे. शीना बोरा हत्याकांडासारखा थरार उघडल्याची चर्चा समोर आली असता संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.दुरशेत गावच्या हद्दीत एका सुटकेसमध्ये अज्ञात तरुणीचा मुतदेह आढळला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चुनाभटीतील काही अंतरावर अचानक दुर्गंधी पसरु लागली असता स्थानिक ग्रामस्थांनी संशयित वासाचा मागोवा घेतला असता साईपटटीजवळील खड्डयात सुटकेस पडलेली दिसली. दुर्गंधी सुटकेसमधून वास येत असल्याची खात्री होताच ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली.खबर मिळताच खरोशी गावचे पोलीस पाटील करुणा पाटील यांनी पोलिसांना कळवले.पेण सहाय्यक पोलीस निरीक्षक राजपूत हवालदार पेणकर यांनी घटनास्थळी जाऊन सुटकेस उघडली.आतमध्ये 20 ते 40 वर्षाच्या वयोगटातील तरुणीचा मुतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. प्राथमिक तपासानुसार अंदाजी चार ते पाच दिवसापुर्वी तिची हत्या करुन निर्जल ठिकाणी फेकला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या हत्येचे कारण आणि मारेकऱ्यांचा माग काढणे पेण पोलीसासाठी मोठे अवाहन आहे मुळचे तरुणी कोण याची हत्या का केली कोणी केली याचा प्रश्र अनुतरीत असून पोलीस विविध दिशेने तपास करित आहेत रहस्यमय सुटकेसमध्ये मडरचा तपास लवकरच उलघडेल का हे पाहणे महत्त्वाचे आहे पत्रकार पेण तालुका प्रतिनिधी प्रदिप रामचंद्र सताणे मो.नं.9172733219..
Discussion about this post