अपुऱ्या तथा अप्रशिक्षित सुरक्षा रक्षकांच्या बळावर सुरजागडच्या अवजड वाहनांवर अंकूश लागेल का !
- भं. तळोधी मार्गे लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांना परवानगी कुणाची?
गोंडपिपरी: गडचिरोली जिल्ह्यातील बहुचर्चित सुरजागड प्रकल्पामधील लोह खनिजाची वाहतूक करणारी जड वाहने धोकादायक आहेत.याची सर्वांना प्रचिती झाली. या अवजड वाहनांमुळे कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले तर काहींना तरुण्यातच आपला जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागले आहे.
हा प्रकल्प राबवित असताना यातील लोह खनिजाची वाहतूक करणारी वाहने मानवी परिस्थितीला जबाबदार ठरू नये म्हणून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मार्ग सुरक्षा रक्षकांची जागोजागी नेमणुक करण्यात आली.मात्र त्यांचे हे नियोजन कुचकामी असल्याने समाजातील घटकांना याचा फारसा लाभ झाला नाही.कारण मार्ग सुरक्षा रक्षकांना वाहतुकीवर नियंत्रण कसे मिळवायचे आणि प्रकरण कसे हाताळायचे याचे कुणालाही अनुभव नाही, आणि अनुभवा शिवाय या मार्ग सुरक्षा रक्षकांना नेमण्यात आले. त्यामुळे त्यांचे कडून पाहिजे तशी सेवा मिळत नसल्याने जड वाहनांमुळे उत्पन होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघातावर नियंत्रण मिळवण्यास असमर्थ ठरले हे सर्वश्रुत आहेच.शिवाय कंपनी देखील लोकांप्रती उदासीन असुन प्रकरणाला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून दिसून आले.याखेरीज कंपनी कडून वाहतुकीवर संपूर्ण नियंत्रण आणण्यासाठी आत्तापर्यंत कोणतेय ठोस निर्णय घेण्यात आले नाही.
सुरजागड आणि कोनसरी प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना
तारणहार ठरत असताना मात्र गोंडपिपरी तालुक्याला तो मारक ठरला आहे. प्रकल्पाच्या अनियंत्रित वाहनांमुळे कित्येकांना प्राणांची आहुती द्यावी लागली तर अनेकांना आर्थिक हानीचा सामना करावा लागला व लागत आहे. या दोन प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला हि येथील नागरिकांसाठी आनंदाची बाब आहे. परंतु प्रकल्पातील राजुरा, बल्लारशाह,चंद्रपूर याठिकाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या लोह खनिजाची वाहतूक प्रामुख्याने गोंडपिपरी तालुक्यातून मोठ्या प्राणावर केली जाते. याचे परिणाम गोंडपिपरी वासीयांना भोगावे लागत आहे? येथेही बेरोजगारांची फौज उभी टाकलेली आहे मग त्यांच्या रोजगाराचे काय? बोटावर मोजण्याइतके येथील युवकांना मार्ग सुरक्षा रक्षक दलात सामावून घेतले.
तालुक्यातून बेदारक धावणाऱ्या वाहनांमुळे उत्पन्न होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीचा सामना येथील जनता करावी आणि स्थानिक रोजगार बाहेर गावातील तरुणांना मिळावा का? हा एकप्रकारचा तालुक्यावर अन्यायच म्हणावा लागेल.कारण प्रकल्पातील जड वाहनांची संख्या लक्षणीय असल्यामुळे त्यांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे येथील वाहतुकीची समस्या अधिकच बिकट झाली आहे.एवढेच नाही तर जड वाहनांमुळे शहरातील वातावरण दूषित झाले असून आरोग्याची समस्या भेडसावत आहे. त्याच बरोबर रस्ते देखील मोडकळीस येत आहेत. इतक्या साऱ्या गोष्टी स्थानिकांना सहन करावा लागत असताना येथील लोकप्रतनिधींकडून याविषयी ब्र सुध्दा निघत नाही हि विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
सुरजागड प्रकल्पातील यमदुत रूपी वाहनांच्या दहशतीत येथील नागरिकांना वावरावे लागत असून अनेकांना जीव मुठीत धरून घालावे लागत आहे. तरी यावर कंपनीकडून विशेष उपाययोजना करण्यात आले नाही.कंपनीची एकच व्यवस्था कार्यरत आहे ती म्हणजे मार्ग सुरक्षा रक्षक, परंतु यातही पुरेशी संख्या बळ (मैन पॉवर) नाही. असा हेळसांडपना सुरजागड प्रशासन करत असेल तर वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल का? यामध्ये युवकांचा भरणा करून भरती पूर्व वाहतुक हाताळण्याचे प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित करावे. यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, यासाठी येथील स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे. जेणे करून येथील बेरोजगार युवकांना पूर्ण वेळ काम मिळेल यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने कंपनीशी समन्वय साधून चिंतन करण्याची गरज आहे.
तळोधी मार्गे तेलंगणा राज्यात लोह खनिजाची वाहतूक
Discussion about this post