
जिजाऊ ताराराणी चा आदर्श महिलांनी घ्यावा —बाळराजे आवारे पाटील..
धारूर दि ११(प्रतिनिधी)
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान कडून महिलादिनी महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील,
मराठवाडा संपर्क प्रमुख आण्णासाहेब जाधव,
महिला प्रदेश अध्यक्ष राजेश्री उंबरे पाटील,संदिप भैय्या चाळक
नांदेड जिल्हा अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,
हिंगोली जिल्हा अध्यक्ष पिंटु गोरे,
हिंगोली महिला जिल्हा अध्यक्ष वर्षाताई खंदारे,
धाराशिव जिल्हा अध्यक्ष ॲड प्रणित डिकले,
बीड जिल्हा अध्यक्ष अजयसिंह काळे,
लातूर जिल्हा अध्यक्ष सचिन पवार,
मेकअप आर्टिस्ट प्रियंका राऊत,
धारूर सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचन गवळी ,धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान पदाधिकारी यांच्या हस्ते महिलांचा सन्मान करण्यात आला.
धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान च्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 140 महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला. तसेच महिलांसाठी मोफत ब्युटी पार्लर चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गटाचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले.
या वेळी महिलांना संबोधित करताना धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी एक भाऊ म्हणून मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा राहिल हा शब्द दिला. तसेच महिलांनी तारारामी जिजाऊंचा विचार घेऊन निर्भीडपणे उभ्या राहिल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले.
सत्कार समारंभ कार्यक्रमास महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चाळक यांनी केले तर आभार गंभीरे यांनी मानले..
Discussion about this post