
( आर्णी तालुका कार्यकारणी गटीत )
श्री. रमेश राठोड सावळी सदोबा
सावळी सदोबा: – भारत सरकार निती आयोग द्वारा मान्यताप्राप्त अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद ची ग्राहक जनजागृती सभा व आर्णी तालुका कार्यकारणी गठीत विश्रामगृह आर्णी येथे करण्यात आली.
या सभेला अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गजानन मुदगल. महाराष्ट्र विधी सल्लागार प्रभाकर वानखडे. पश्चिम विदर्भ अध्यक्ष संजय जाधव. पश्चिम विदर्भ संघटक सौ प्रेमिला डोंगरे. यवतमाळ जिल्हाध्यक्ष कैलास गावणार उपस्थित होते. सावित्रीबाई फुले याच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. ग्राहकाशी संबंधित असलेल्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी काम केल्या जाईल असे आर्णी तालुका अध्यक्ष चिंतामन चहांदे यांनी म्हटले. यावेळी तालुका सचिव बुद्धकिरण शेंडे. उपाध्यक्ष प्रणय बोंबले. सहसचिव संजय राठोड. प्रसिद्धी प्रमुख अनिकेत खारोळ तर नुरासिंग राठोड दीपक खूळसंगे.माधुरी गवळी यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी जिल्हा कार्यकारणी सदस्य देवकिरण खडसे. दारव्हा तालुका अध्यक्ष विना राठोड. आर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भगत. दारासिंग चव्हाण साहेबराव भालेराव आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व संचालन आर्णी तालुका अध्यक्ष चिंतामन चहांदे तर आभार बुद्ध किरण शेंडे यांनी केले..
Discussion about this post