
व सेलू शहरातील व तालुक्यातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली. दहावीच्या परीक्षा चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे. तसेच सेलू शहरातील महावितरणच्या डीपीवर एबी स्विच नसल्यामुळे डीपीला काही लहान सहान आलेले प्रॉब्लेम नीट करण्यासाठी अर्ध्या सेलू ची लाईट बंद करावी लागत आहे. हे पण त्यांच्या कानावर घालून प्रत्येक डीपीवर एबी स्विच बसवण्यात यावी जेणेकरून लाईटची अडचण येणार नाही अशी मागणी केली. यावेळी अधीक्षक अभियंता टेंभुर्णी साहेबांनी सकारात्मकता दाखवून या अडचणी ताबडतोब दूर करण्याच्या सूचना सेलू उपअभियंता केंद्रे साहेब व शहर अभियंता मंत्री साहेब यांना दिल्या. यावेळी जयसिंग शेळके, उप अभियंता केंद्रे साहेब, शहर अभियंता मंत्री साहेब, पराग गोळेगावकर, संदीप रोडगे आदी उपस्थित होते..
Discussion about this post