प्रतिनिधी :- श्रीकांत कोताडे
मुंबई-नागपूर महामार्गावरील एस.जे.एस.हॉस्पिटलजवळ आज सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला असून यात भरधाव असलेली महिंद्रा स्कॉर्पिओ (एम.एच.१२ एन.झेड.००५७ ) ही मुंबईकडून नागपूरच्या दिशेने जात असताना तिच्यावर चालकाचे असलेले नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सदर वाहन साई जनार्दन हॉटेलजवळील गोदावरी स्टॉलमध्ये घुसली आहे.या दुर्घटनेत सुनंदा साबळे नावची एक महिला (वय -५६)मृत तर एक जण ह.भ.प.सुदाम काशिनाथ साबळे व त्यांची भावजय अलका वसंत साबळे हे दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही….
Discussion about this post