

ॲड.श्याम खंडारे,राष्ट्रीय महासचीव
यवतमाळ प्रतिनिधी :- विरेंद्र चव्हाण..
जेष्ठ कलावंत/ साहित्यीकांचे गत तीन वर्षापासून चे मानधन प्रस्ताव धूळ खात पडून असल्याने कलावंतांमधे पसरलेला असंतोष दूर करून न्याय मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सातही आमदार तथा मंत्री महोदयाचे लक्ष वेधण्यासाठी अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीने एक दिवशीय लाक्षणिक ऊपोषणाची हाक दिली,ह्या प्रसंगी कलावंतांना संबोधित करतांना समितीचे राष्ट्रीय महासचीव ॲड.श्याम खंडारे ह्यांनीआपले मनोगत व्यक्त केले ,
शासनाने 16 मार्च 2024 च्या शासन निर्णयानूसार कलावंतांचे मानधन सरसकट पाच हजार रूपये मंजूर केल्याने कलावंतांच्या आशा पल्लवीत झाल्यात,ग्रामीण व शहरी भागातील संघटीत व असंघटीत दर्जेदार कलावंत ज्यांची ऊपजिवीका कलेच्या सादरीकरणावर निर्भर आहे अशा हजारो गोर गरीब कलावंतांनी आपले मानधन प्रस्ताव सादर केलेत.मानधन मिळाल्यास आपल्या जगण्याला आधार होईल ही अपेक्षा ठेवून आजही मानधनाच्या निवडीपासून प्रतिक्षेतच आहेत, निवड प्रक्रीयेच्या विलंबाचे कारणाबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता पालक मंत्री महोदयांनी अशासकीय सदस्य नियूक्त करून समिती गठीत करावयाची असल्याने प्रक्रीया रखडलेली असल्याचे प्रशासनाकडून ऊत्तर मिळत आहे.तर 2023,2024 ह्या दोन वर्षाचे ऑफलाईन प्रस्ताव मंजूरातीचे निकष कसे ठरवायचे ह्याबाबत संभ्रमात असलेले प्रशासन सांस्कृतीक मंत्रालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात व्यस्त आहेत.
अ.भा.कलावंत न्याय हक्क समितीच्या वतीने कलावंतांची होत असणारी अवहेलना लोकप्रिय आमदार तथा लोकप्रतिनिधींच्या लक्षात आणून देण्यासाठी जिल्ह्यातील सातही आमदार तथा मंत्री महोदयांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर दि 08 मार्च रोजी एक दिवशीय लाक्षणिक ऊपोषणाची हाक देण्यात आली ,आणि हजारो कलावंतांच्या ऊपस्थिती मधे आमदार महोदयांना आपल्या संवेदना व्यक्त करून ,जिल्ह्यातील कलावंतांना न्याय व दिलासा मिळवून द्यावा.अशी आग्रही विनंती केली..यवतमाळ विधान सभा क्षेत्राचे आमदार मा.बाळासाहेब मांगूळकर , वणी विधान सभा क्षेत्राचे आमदार मा.संजय देरकर ,मा.श्री. किसनरावजी वानखडे आमदार ऊमरखेड, मा.राजूभाऊ तोडसाम आमदार केळापूर,ह्यांनी कलावंतांच्या ऊपोषण मंडपात बसून व्यथा जाणून घेतल्या मा.ना श्री संजय भाऊ राठोड पालक मंत्री ,मा.ना.श्री.डाॅ.अशोकराव ऊईके मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री , मा.ना.श्री ईंद्रनील नाईक राज्यमंत्री ह्याचे ओ एस डी नी ऊपोषण मंडपात येवून निवेदन स्विकारले, आणि ऊप मूख्य कार्यकारीअधिकारी (पंचायत) मा श्री.पंकज भोयर साहेब ह्यांनी मा.ना.श्री.संजय राठोड साहेब ह्यांचे जन संपर्क कार्यालया समोरील मंडपात भेट देवून समस्या जाणून घेतली व तातडीने ह्यावर कार्यवाही सूरू करीत असल्याचे सांगीतले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी
समितीचे तालूकाध्यक्ष सर्वश्री,मा.देवबन गोस्वामी,रणजीत शेजूळे,जि.प्र.मारोतराव सूरोसे,नथ्थू जी महाराज,जि.प्र.कैलाश महाराज,विनोदभाऊ मडावी ,गंगाधरजी घोटेकर,वासूदेवरावजी दाभेकर,पदमाकर कावळे,राजू भाऊ सिडाम,चंपतराव पाचभाई, रामकृष्ण वडस्कर,दत्ताभाऊ मदने,मारोतरावजी आत्राम मनोज भाऊ राठोड,अनंतराव कोटकजवार,हरिश्चंद्र बल्की,अविनाश ठाकरे,भिमराव वानखडे,राजानंद भगत,रमेश राठोड,जि.प्र. गौतमराव तूपसंदरे,महीला तालूका आघाडी प्रमूख,वारकरी आघाडी प्रमूख जिल्हा प्रतिनिधी आणि विदर्भ प्रमूख मनोहर शहारे,विदर्भ कार्याध्यक्ष मा.सिध्दार्थ भवरे,जिल्हाध्यक्ष अविनाश बनसोड, वारकरी जिल्हा आघाडी प्रमूख मारोतराव ठेंगणे, ऊपाध्यक्ष गूणवंतराव लडके,महासचीव रमेश वाघमारे,जिल्हा संघटक अशोकराव ऊम्रतकर ,हंसराज तलवारे,किशोर भाऊ ईगळे,जि.प्र. विनायकराव माने,मार्गदर्शक मनोहर दादा बानस्कर,सूरेश भाऊ कूबडे,प्रकाश भाऊ करमनकर, विजयराव देशमूख,ई.नी कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी परिश्रम घेतले त्याबद्दल आभार मानले..
Discussion about this post