
बातमीदार – कु.गणेश राम यादव..
उन्हेरे खुर्द, उन्हेरे बुद्रुक, केशवनगर, कुंभारशेत, एकलघर, बलाप, राबगाव, शिळोशी, पिलोसरी असे सर्व एकूण नऊगावे देवस्थान तर्फे अखंड हरीनाम जप यज्ञ सोहळा आणि ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण साडेतीन दिवसाचे योजण्यात आले आहे. श्रीरामप्रभुच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजे श्री क्षेत्र उन्हेरेबुद्रुक हे आहे. येथे स्वयंभु कामेश्वराची पिंडी, प्रसिद्ध श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, शनिदेव महाराज मंदिर आणि रामकालीन गरम पाण्याचे झरे(कुंड) आहे. ह्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे खासदार- मा.श्री. सुनीलजी तटकरे साहेब, खासदार- मा.श्री. धैर्यशील पाटील साहेब, आमदार- मा.श्री. रवीशेठ पाटील साहेब, आमदार- मा.श्री. महेंद्रशेठ दळवी साहेब, मा.श्री. रवींद्र आ. देशमुख साहेब – माजी रा.जि.प.सदस्य, मा.श्री.कुंभार साहेब -तहसीलदार-सुधागड-पाली, श्रीमती. सरिता चव्हाण मॅडम -पोलीस निरीक्षक पाली असे येथे उपस्थिती प्रार्थनिय होती. श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान उन्हरेबुद्रुक येथील गरम पाण्याचे हौद/कुंड हे महाराष्ट्रातील आणि भारत देशातील प्रसिद्ध ठिकाण आहे. येथे रोज दररोज भारत देशातून अनेक भाविक भक्त मंदिरात दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी येत असतात. उन्हेरेबुद्रुक येथे साडेतीन दिवस रोज दररोज ज्ञानेश्वरी पारायण वाचन झालेले आहे. प्रवचन, भजन, कीर्तन, वारकरी संप्रदाय मंडळाने समूहाने सर्वांनी आनंदाने साडेतीन दिवस कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम चांगले भक्ती गजारात पार पाडले. दि. 11/3/2025 रोजी सकाळी 10 ते 12 वा. काल्याचे कीर्तन गु.ह.भ.प. दिलीप महाराज देशमुख-वाघोशी यांनी त्यांच्या सुश्रव्य वाणीतून कीर्तनाच्या गजारात भक्ती भावाने,भक्ती रूपात कीर्तन केलेले आहे आणि त्यांनी सुवाच्या शब्दात कार्यक्रमाची सांगता केली आहे.ह्या कार्यक्रमाला हजारो भाविक भक्त जमा झालेले दिसण्यात आले. काही दानधर्म करणारे दानशूरांनी सढळ हस्ते वर्गणी पैशांच्या स्वरूपात दान केली आहे. दुध, साखर, पाणी, जेवण, चहा, नाश्ता, फराळ अनेक दानशूरनीं दान केले आहे. येथे साडे तीन दिवस कार्यक्रम आनंदाने पारपाडण्यात आलेले आहे. नऊगाव पंचक्रोशी ग्रामस्थ, श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान विश्वस्त कमिटी आणि सप्ताह कमिटी आणि भोजन कमिटी – उन्हेरे बुद्रुक यांनी सर्वांचे आभार मानले असून कायम अशीच साथ देण्यात यावी असे आभार प्रदर्शन केलेले आहे..
न्युज रिपोर्टर-रायगड/पुणे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार-कु. गणेश राम यादव-मो.8483014657/व्हा.7218101984,
Discussion about this post