पांडुरंग जगताप (धारुर प्रतिनिधी)
केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने धाराशिव -बीड -छत्रपती संभाजीनगर (२४०किमी), आणि छ.संभाजीनगर- चाळीसगाव(९३किमी) या दोन नवीन रेल्वे मार्गांच्या अंतिम सर्वेक्षणास मंजुरी दिली आहे.
या प्रकल्पांसाठी ८.३२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हे मार्ग मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयी सुधारून आर्थिक प्रगतीला चालना देणार आहेत. मराठवाड्यातील सर्वात मागास जिल्हा व ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे.बीड शहराला रेल्वे मार्गाने जोडल्यामुळे शेती उत्पादनांची वाहतूक, लोकल उद्योगांना बाजारपेठेची सोय, आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे.
रेल्वे प्रकल्पामुळे बांधकाम, रेल्वे सेवा आणि तत्सम क्षेत्रात हजारो नोकऱ्या निर्माण होऊन प्रत्येकाच्या हाताला काम मिळणार असून येथील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे.
ही रेल्वे मार्गीका मराठवाड्याच्या दळणवळणाच्या सोयीमध्ये मोठी क्रांती घडवेल आणि विकासाला गती मिळेल, असा विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला.
मंजूर रेल्वे मार्ग व एकूण खर्च खालील प्रमाणे आहे..
✅ धाराशिव(उस्मानाबाद)-बीड-छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) (240 किमी) – ₹6 कोटी
✅ छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद)-चाळीसगाव (93 किमी) – ₹2.32 कोटी
Discussion about this post