खर्डी, ११ मार्च २०२५:
स्वच्छ भारत योजनेमुळे अनेक शहरे आणि गावे स्वच्छ होत असताना, खर्डी गावातील ऐतिहासिक शिवकालीन तलाव मात्र नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
या तलावात मोठ्या प्रमाणावर शेवाळ साचले असून, रहिवाशांकडून येथे कचरा टाकला जात आहे, ज्यामुळे तलावाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कधीकाळी पर्यटनाचे केंद्र असलेला हा पाझर तलाव आता दयनीय स्थितीत आहे. तीन ते चार एकर जागेतील हा तलाव दरवर्षी पावसाळ्यात भरतो, परंतु संरक्षण भिंतीअभावी आणि पाण्याचा योग्य उपयोग न केल्यामुळे त्याची दुर्दशा झाली आहे.
स्थानिक रहिवासी आणि पशुधारक येथे घरातील घाण टाकत असल्याने तलाव परिसर बकाल झाला आहे. तलावातील पाणी दुर्गंधीयुक्त झाले असून, गाळ साचल्याने त्याचे शोभिकरण करण्याची गरज आहे.
या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने खर्डी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मनसे खर्डी शहर अध्यक्ष सगीर शेख आणि उपविभाग अध्यक्ष प्रकाशजी धाबे उपस्थित होते.
– प्रतिनिधी, शहापूर तालुका

Discussion about this post