प्रहार शेतकरी संघटनेचे वतीने उंदरगावात गृह उपयोगी संच वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 611 लाभार्थ्यांना गृह उपयोगी संचाचे वाटप करण्यात आले.
प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके आणि प्रहार शेतकरी संघटनेचे माढा तालुका अध्यक्ष अमोल केसरे यांच्या वतीने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. पत्रकार मदन दादा चवरे आणि कंदर चे प्रसिद्ध उद्योजक सुहास दादा कदम यांच्या हस्ते सदर शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सदर शिबिरामध्ये महिलां कामगाराचा लक्षणीय सहभाग दिसून आला. या प्रसंगी संतोष कोळी, युवराज तांबीले, रविकांत कोळेकर, प्रशांत चव्हाण, किरण लवटे, संदीप चव्हाण, अतुल थोरात, आबासाहेब कोळेकर पोपट घुले यांचे विशेष सहकार्य लाभले तर नानासाहेब लोकरे, बाळासाहेब बरबडे, जयराम गुंड, जमीर शेख, अजिंक्य कासार, माणिक भुसारे, शंभूराजे भुसारे, स्वप्नील चव्हाण, आप्पासाहेब गवळी यांच्या सह अनेक कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.
Discussion about this post