दारफळ प्रतिनिधी
12/3/2025
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माढा नं. 2 येथील श्री शिवानंद रायबा बारबोले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने माननीय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले 2023-24 सालचा पंचायत समिती कुर्डूवाडी तालुका माढा येथील शिक्षण विभाग यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. 2 येथे कार्यरत असणाऱ्या श्री शिवानंद बारबोले यांना देण्यात आला
. श्री शिवानंद बारबोले हे दारफळ (सीना) गावचे रहिवासी आहेत. पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री शिवानंद बारबोले यांच्या कुटुंबातील त्यांची आई सौ लता बारबोले (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका) वडील रायबा बारबोले (सेवानिवृत्त मुख्याध्यापक) त्यांच्या पत्नी सौ अमृता बारबोले बंधू श्री महेश बारबोले (सेल टॅक्स इन्स्पेक्टर STI) सुजित बारबोले (प्रगतशील शेतकरी), त्यांची दोन्ही मुले शिवांश व शंभू उपस्थित होती यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी विकास यादव साहेब शिक्षण विस्तार अधिकारी दिगंबर काळे साहेब, केंद्रप्रमुख विजय काळे, केंद्रप्रमुख सुरेश माळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक माढा शहर व परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, केंद्रातील सहकारी शिक्षक उपस्थित होते.
गट विकास अधिकारी महेश सुळे साहेब, दारफळ गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य, नवभारत विद्यालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त, मुख्याध्यापक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आजी-माजी शिक्षक, ग्रामस्थ व मित्रमंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
सारथी महाराष्ट्राचा दारफळ प्रतिनिधी अशोक शिंदे मो 9766976263
Discussion about this post